Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी पोलीस ठाण्याला माहिती देणे बंधनकारक

जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी पोलीस ठाण्याला माहिती देणे बंधनकारक

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून होणाऱ्या वाहन खरेदी-विक्री संदर्भातील संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. संबंधित व्यावसायिकांनी माहिती न दिल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २२४ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कोकणात संपूर्ण स्वयंचलित काजू प्रक्रिया प्रकल्प उभारा– पणन मंत्री जयकुमार रावल – सविस्तर बातमी 

ग्रामीण भागामध्ये वाढत्या नागरी वसाहतींमुळे जुन्या मोटारसायकली व इतर वाहनांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु याबाबत योग्य तपशील न ठेवल्यामुळे चोरीच्या वाहनांची खरेदी-विक्री होण्याची शक्यता वाढत असून गुन्ह्यांच्या उघडकीस येण्यास अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील.

व्यावसायिकांनी खरेदी-विक्री होणाऱ्या वाहनांचा क्रमांक, इंजिन व चासी क्रमांक, मूळ मालकाचे नाव व संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, ओळखपत्र, वाहनांचे आरसी, टीसी पुस्तक, तसेच खरेदीदाराचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व ओळखपत्र यासह तपशीलवार माहिती संकलित करून दर ७ दिवसांनी संबंधित पोलीस ठाण्याला सादर करणे आवश्यक राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×