Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य पिकांसाठी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य पिकांसाठी पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – कृषी विभागामार्फत आयोजित रब्बी हंगाम पीक स्पर्धेत 31 डिसेंबर 2025 पर्यंत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले. रब्बी हंगाम सन 2025 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र असून सर्वसाधारण गटासाठी रक्कम 300 रुपये व आदिवासी गटासाठी रक्कम 150 रुपये राहील.

चांगल्या कामासाठी मदत मागा; दानशूर सढळ हाताने देतात- डॉ. सदानंद मोरे – सविस्तर बातमी 

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12,8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आदी कागदपत्र आवश्यक आहेत. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्या पुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात येईल. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येतील.

स्पर्धेतील विजेत्यांना तालुका पातळीवर अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 हजार रुपये, जिल्हा पातळीवर 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये तर राज्य पातळीवर 50 हजार, 40 हजार व 30 हजार रुपये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात येईल. पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन हाके यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×