पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जाहीर आवाहन
marathinews24.com
पुणे – पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यांतर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद – सविस्तर बातमी
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी १६५ वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क केलेला नाही; तसेच वाहन सोडवून घेण्याबाबत हक्कही सांगितलेला नाही. अशा वाहनांच्या जाहीर लिलाव ९ व १५ मे या दिवशी करण्यात येणार आहे. ही वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे कार्यालयाच्या आवारात, आळंदी रस्ता कार्यालय, बालेवाडी बस डेपो, दिगंबर डेअरी कात्रज, हडपसर बस डेपो, कात्रज पीएमपीएमएल डेपो, कोथरूड बस डेपो, राजंणगाव पोलीस स्टेशन, सासवड एस.टी. डेपो, शेवाळवाडी डेपो, शिंदेवाडी डेपो, वाघोली वाघेश्वर पार्कीगआवारात १३ मे पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत पाहणीसाठी उपलब्ध आहेत. या वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे. ही वाहने बेवारस वाहने असल्याचे समजून सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीने वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येईल.
या वाहनांचा जाहीर लिलाव प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच https://eauction.gov.in आणि https://www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळांना तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, ३९, डॉ. आंबेडकर रोड, संगम पुलाजवळ, पुणे- १ येथे साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी केले आहे