पुण्यात ५ पोलीस ठाण्यांना मंजुरी, पोलीस आयुक्तांच्या प्रयत्नांना यश

८३० मनुष्यबळही मिळणार

marathinews24.com

पुणे – शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनासह कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पुणे पोलिस आयुक्तालयातंर्गत नव्याने ५ पोलीस ठाण्यांना गृह व वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासोबतच ८३० मनुष्यबळही उपलब्ध होणार असून, दोन परिमंडळाच्या स्थापनेलाही परवानगी देण्यात आली आहे. नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

सेवा पंधरवड्यात महसूल, ग्रामविकास, आरोग्य आदी विभागांच्या विविध सेवा नागरिकांच्या दारात – सविस्तर बातमी 

राज्यातील इतर आयुक्तालयाच्या तुलनेत अवघ्या एक वर्षाच्या आतमध्ये तब्बल १२ पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसह दोन परिमंडळ मंजूर झालेले पुणे पोलीस आयुक्तालय अव्वल ठरले आहे. पहिल्या टप्प्यात थेट ७ पोलीस ठाण्यांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत फळाला आली. त्याठिकाणी काम करण्यासाठी शासनाने ८१६ पदांची मान्यता दिली होती. त्यानंतर आता पाच पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला गृह व वित्त विभागाने हिरवा कंदील दिला असल्यामुळे नव्याने ८३० मनुष्यबळ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त संजय पाटील, एसीपी विवेक पवार, एसीपी राजलक्ष्मी शिवणकर यांनी वेळोवेळी शासनाने पाठपुरावा केला.

पुण्यात वाढत्या लोकसंख्यासह गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने आणखी ५ पोलीस ठाण्यांची निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. लोहगाव, नर्‍हे, मांजरी, लक्ष्मीनगर (येरवडा), येवलेवाडी (उंड्री) अशा पाच नवीन पोलीस ठाण्यांची निर्मितीला गती मिळाली आहे. त्यासोबतच आणखी २ पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांची पदे निर्मितीचाही मार्ग मोकळा झाला आहे. नवीन पोलीस ठाणी, चौक्यांमुळे पोलीस दलाचे कामकाज सक्षम होणार आहे. विमानतळ ठाण्यातून लोहगाव पोलीस ठाणे, नांदेड सिटीतून नर्‍हे पोलीस ठाणे, हडपसरमधून मांजरी, येरवडा ठाण्यातून लक्ष्मीनगर आणि कोंढवा ठाण्यातून येवलेवाडी पोलीस ठाण्याच्या निर्मितीला हिरवा कंदील मिळाला आहे.

पुण्यात नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील होतो. राज्य शासनासह गृह विभागाने आमच्या मागण्याही मान्य केल्या. ५ पोलीस ठाण्यांच्या उभारणीला हिरवा कंदील मिळाला असून, दोन परिमंडळासह मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×