Breking News
अमली पदार्थांविरोधातील लढ्यात युवकांनी पुढे यावे- पोलिस आयुक्त अमितेश कुमारराज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारबांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्यामतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वितपुण्यात ठेकेदाराकडे मागितली ३७ लाखांची खंडणीकौशल्य प्रशिक्षणामुळे युवक आत्मनिर्भर बनतील – डॉ. बबन जोगदंडगणना अर्जांच्या डिजिटायझेशनमध्ये राजकीय पक्षांनी सक्रिय भूमिका घ्यावीपुण्यात मिशन क्रॅकडाउनचा गुंडांना तडाखा बसणारह.भ.प. उमेश महाराज मोरे यांच्या हस्ते लोणी देवकर एमआयडीसी येथे वृक्षारोपणजगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानंतर बारामतीत स्वच्छता मोहीम

तब्बल २ हजार ६५ लीटर गावठी दारू जप्त

काळेपडळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – अवैद्य गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्रीच्या ठिकाणी काळेपडळ पोलिसांनी छापा टाकून अड्डा उध्वस्त  केला आहे. छाप्यात तब्बल ५३ कॅनसह एका बॅरलमध्ये भरुन ठेवलेली २ हजार ६५ लिटर गावठी हातभट्टी जप्त केली आहे. ४ लाख १३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नवीन दिलीप बिनावत  (वय ५४   रा. सातवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) असे अटक केलेल्याचे आरोपीचे नाव आहे.

अवैध धंदे करणार्‍याविरूद्ध कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर काळेपडळ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडून ठिकठिकाणी अवैध धंद्याची शोधमोहिम राबविण्यात आली. ११ जूनला तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, दाऊद सय्यद, अतुल पंधरकर, खोकले, महादेव शिंदे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सातवनगरात बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगजवळ एकजण दारूसाठा करुन विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. तपास पथकाने सापळा रचून हातभट्टी अड्डयावर छापा टाकून कारवाई केली. आरोपी नवीन दिलीप बिनावत याला ताब्यात घेतले.
त्याठिकाणाहून पोलिसांनी तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले ५३ कॅनसह बॅरेलमध्ये भरुन ठेवलेली २ हजार ६५ लिटर हातभट्टी जप्त केली. आरोपीविरूद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम सन १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, अमोल फडतरे, शाहीद शेख, नितीन ढोले, प्रविण कांबळे,   परशुराम पिसे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×