Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

भांडण लावल्याची शंका, टोळक्याकडून तरूणावर वार

तरुणावर तीन जणांनी केला चाकू हल्ला

खडकीतील रेंजहिल्स परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – भांडण लावल्याच्या शंकेतून बाप-लेकासह इतर आरोपींनी तरूणावर वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना ११ जूनला संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास खडकीतील रेंजहिल्स परिसरात घडली आहे.

स्वच्छतागृह साफसफाईला दिला नकार, अल्पवयीनाला जीवे मारण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी

याप्रकरणी खडकी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, इतरांचा शोध घेतला जात आहे.  राजू भिकान मोरे (वय ५० रा. औंध रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर रूतिक मोरे याच्यासह इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. संदीप कदम (वय ३२ रा. लोहगाव) असे गंभीर जखमीचे नाव असून, त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू मोरे आणि संदीप कदम  ओळखीचे असून, एकाचठिकाणी काम करतात. केटरर्सच्या ठिकाणी संदीपने भांडण लावल्याचा संशय राजूला होता. त्याच रागातून ११ जूनला संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास खडकीतील रेंजहिल्स परिसरात टोळक्याने संदीपला गाठून त्यांच्यावर वार केला.

घटनेची माहिती मिळताच खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्यासह पोलीस निरीक्षक बागवे, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांनी धाव घेतली. याप्रकरण्राी आरोपीला अटक केली असून, इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×