Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

स्वच्छतागृह साफसफाईला दिला नकार, अल्पवयीनाला जीवे मारण्याचा प्रयत्न

येरवड्यातील सुधारगृहातील घटना, पाचजणांविरूद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – सुधारगृहातील स्वच्छतागृह सफाई करण्यास नकार दिल्याच्या रागातून पाच अल्पवयीन आरोपींनी एका १७ वर्षीय मुलाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोरीने गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना १० जूनला सकाळी नउच्या सुमारास येरवड्यातील पंडीत जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात घडली आहे. याप्रकरणी पाचजणांविरूद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नात्याला काळिमा फासला, पत्नीवर बलात्कार करण्यास मित्रांनाच भाग पाडले – सविस्तर बातमी

सानू सत्येंद्र यादव (वय १७) असे जखमीचे नाव आहे. संतोष किसन कुंभार (वय ४९, रा. चर्‍होली, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुंभार हे पंडीत जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र सुधारगृहात वाहक म्हणून कामाला आहेत. १० जूनला सकाळी नउच्या सुमारास आरोपी अल्पवयीन मुलांनी सानू यादव याला स्वच्छतागृह साफ करण्यास सांगितले. मात्र, त्याने साफसफाईला नकार दिल्यामुळे आरोपींनी संगनमत करून सानूला सुधारगृहातील बराकीत गाठले. आरोपी अल्पवयीन मुलांनी त्याला बेदम मारहाण करीत शिवीगाळ केली. टॉवेलची किनारीची दोरी बनवून सानूचा गळा आवळून खूनाचा प्रयत्न केला.

त्याने आरडाओरड केल्यामुळे सुधारगृहातील कर्मचार्‍यांसह-अधिकार्‍यांनी धाव घेतली. याप्रकरणी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक टकले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×