Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

वैमनस्यातून तरूणाचा खुनाचा प्रयत्न

Pune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटले

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणाच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कोरेगाव पार्क भागातील संत गाडगे महाराज वसाहतीत घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गौरव बबन राजगुरु (वय २७, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ किशोर गायकवाड (वय २३, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत गायकवाड याने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लेखक संपत जाधव यांना शिवीगाळ करुन मारहाण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हा ‘डिलिव्हरी बाॅय’ म्हणून काम करतो. आरोपीशी त्याचा वाद झाला होता. शनिवारी (१८ एप्रिल) रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपीने संत गाडगे महाराज वसाहत परिसरात गायकवाडला अडवून शिवीगाळ केली. त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर आरोपी पसार झाला. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांनी घटनास्थळी भेट दिली.
पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×