Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

लेखक संपत जाधव यांना शिवीगाळ करुन मारहाण

लेखक संपत जाधव यांना शिवीगाळ करुन मारहाण

सारसबााग परिसरातील घटना; ५ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – लेखक संपत जाधव यांना शिवीगाळ करुन पिस्तुलाचा धाक दाखविल्याची घटना सारसबाग परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत दीपक कुंडलिक कसबे (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सददेव ढावरे (वय ४२, रा. घोरपडे पेठ), प्रवीण पोपटराव शेलार (वय ३६), प्रमोद नाडे (वय २३), स्वप्नील सोनवणे (वय २२), ओंकार हिंगे (वय २१, सर्व रा. बिबवेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेक्कन नदीपात्रात तरुणाचा खून – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मातंग समाजातील आरक्षणाबाबत सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात शनिवारी (१८ एप्रिल) रात्री बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री दहाच्या सुमारास बैठक संपल्यानंतर लेखक संपत गणपत जाधव तेथे थांबले होते. त्यावेळी आरोपींनी जाधव यांना शिवीगाळ केली तक्रारदार कसबे यांनी मध्यस्थी करुन आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी कसबे यांना शिवीगाळ करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांना मारहाण केली. आरोपी सोनवणे, हिंगे यांनी नाडेला पिस्तूल दिले. पिस्तुलाचा दस्ता कसबे यांच्या डोक्यात मारला, असे कसबे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

कसबे यांच्या डोक्यात गोळी झाडण्याची धमकी दिली. त्यानंतर कसबे घाबरले. जिव वाचविण्यासाठी कसबे तेथून पळलो. त्या वेळी आरोपींनी त्याच्या कसबे आणि कार्यकर्त्यांवर ‘पेपर स्प्रे’ फवारला. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी, तसेच पट्ट्याने मारहाण केली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×