Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

मोटार थांबविल्याने जाब विचारणाऱ्या तरुणाचा खुनाचा प्रयत्न

‘जीममध्ये गाण्यावरुन वादातून मारहाणीची घटना

खडकीतील घटना

marathinews24.com

पुणे – रस्त्यात अचानक मोटार थांबविल्याने जाब विचारणऱ्या तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना खडकी भागात घडली. याप्रकरणी चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली. शाहीद सिराज कुरेशी (वय २५, रा. कासारवाडी), शोएब रसिद कुरेशी (वय २५, रा. येरवडा), वीरेन लक्ष्मण वाघेला (वय २३, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत ३३ वर्षीय तरुणाने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कात्रज घाटात नेऊन तरुणीने साथीदारांच्या मदतीने लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण खडकी परिसरात राहायला आहे. काही आरोपी तरुणाच्या ओळखीचे आहेत. सोमवारी रात्री दुचाकीस्वार तरुण खडकी परिसरातून निघाला होता. त्यावेळी साईबाबा मंदिराजवळ अचानक मोटार थांबविण्यात आली. तरुणाने त्यांना जाब विचारला. तेव्हा मोटारीतून उतरलेल्या आरोपींनी तरुणाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. पसार झालेल्या तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांंचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×