Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

गुढीपाडवा निमित्त आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर

पुणे शहर आठवड्यात फ्लेक्समुक्त करणार

 13 मार्च रोजी आरटीओ कार्यालयात अर्ज करता येणार

marathinews24.com

पुणे – गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदीचे प्रमाण वाढत असल्याने वाहनधारकांना आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळावेत यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या वतीने नवीन मालिका सुरू करण्यात येणार असून त्यासाठी आगाऊ अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना ३१ मे अखेर मुलभूत ओळखपत्रे उपलब्ध करुन द्यावेत-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

खाजगी चारचाकी वाहनांसाठी पसंतीचे नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी इच्छुकांनी दिनांक 13 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत विहित नमुन्यात अर्ज, डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतींसह आरटीओ कार्यालयात सादर करावेत. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असून 16 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता लिलाव आयोजित करण्यात येईल.

दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांकाकरिता अर्ज 16 मार्च 2026 रोजी स्वीकारले जाणार असून त्याचा लिलाव 17 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता सहकार सभागृहात करण्यात येणार आहे.

लिलावासाठी सादर करण्यात येणारा डीडी “R.T.O., Pune” या नावे नॅशनलाइज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचा असावा व दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. अर्जासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी एकच सीलबंद डीडी स्वीकारला जाईल.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1981 च्या नियम 54अ नुसार पसंतीचा नोंदणी क्रमांक 180 दिवसांपर्यंत वैध राहील. लिलावानंतर उर्वरित क्रमांकांसाठी प्रक्रिया https://fancy.parivahan.gov.in⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार असून इच्छुकांनी आधार संलग्नित मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करून पसंती क्रमांक आरक्षित करता येणार आहे.

पुणे आरटीओ कार्यक्षेत्रातील पत्ता असलेल्या वाहनधारकांचेच अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×