Breking News
रुजवू मराठी, फुलवू मराठी” संकल्पनेतून मराठी भाषा गौरव दिन उत्साहातमहिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पापा शेखसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखलरुग्ण हक्क परिषदेचा शिवसन्मान पुरस्कार प्रेरणादायी – भानुप्रताप बर्गे यांचे मतउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेटराज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला मोठा निधीभांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवअजितदादांचा घातपातच, व्हीएसआरला व्हीआयपी ट्रीटमेंट- आमदार रोहित पवारपुण्यात बालेवाडीतील बारमध्ये तरुण-तरुणीचा गोंधळमहाबोधी महाविहार मुक्तीसाठी १० मार्चला पुण्यात राष्ट्रव्यापी धरणे आंदोलनअनैतिक संबंधाला विरोध केल्याने मनोरूग्ण महिलेचा खून

मधु-स्मृती संगीत समारोहात भावपूर्ण सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

मधु-स्मृती संगीत समारोहात भावपूर्ण सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

डॉ. चेतना पाठक, पद्मश्री पंडित मधुप मुद्‌गल यांचे भावस्पर्शी गायन

marathinews24.com

पुणे – लयबद्ध, भावपूर्ण रितीने साकारलेले डॉ. चेतना पाठक यांचे गायन तसेच पद्मश्री पंडित मधुप मुद्‌गल यांनी सुमधुर आणि बहारदारपणे सादर केलेले विविध राग अशी सांगीतिक मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली. निमित्त होते मधुकर खांडवे आणि मधुकर हस्तक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित चौथ्या मधु-स्मृती संगीत समारोहाचे!

महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद – सविस्तर बातमी 

संगीत शिक्षणाला समर्पित ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका डॉ. विद्या खांडवे व आजच्या तरुण पिढीचे आघाडीचे गायक कलाकार आदित्य खांडवे यांच्या संकल्पनेतून न्यू इंग्लिश हायस्कूलच्या आवारातील गणेश सभागृहात समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. समारोहाचे उद्‌घाटन ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यांच्या हस्ते झाले.

समारोहाची सुरुवात किराणा घराण्याची गायकी आत्मसात केलेल्या डॉ. चेतना पाठक यांनी राग अपूर्वकल्याणमधील ‘साई सबन के बनवारे’ या बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुत लयीत ‘ऐसी लगन तुम्ही सो लागी’ ही रचना सादर केली. स्वरांची लयबद्ध आणि भावपूर्ण मांडणी करत राग दुर्गामधील द्रुत खयालातील ‘माता भवानी काली दुर्गा गौरी’ ही रचना तेजस्वीपणे सादर केली. त्यानंतर ‘तान तदानी दानी तदानी’ हा तराणा सादर करून डॉ. पाठक यांनी आपल्या गायनाची सांगता मिश्र पहाडीमधील ‘तुम बिन साजन बरसत नैना’ या रचनेने केली. प्रणव गुरव (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी), फ्युमी निगेशी, पल्लवी कुलकर्णी-घोडके (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

स्वरांचे सखोल चिंतन आणि कमालीच्या संवेदन शीलतेतून साकारलेल्या पंडित मधुप मुद्‌गल यांच्या मैफलीने कार्यक्रमाची रंगत गहरी झाली. पंडित मुद्‌गल यांनी गायनाची सुरुवात छायानट रागातील ‘नेवरकी झनकार’ या विलंबित खयालाने केली. त्याला जोडून ‘झनन झनन’, ‘नही आना’ हे दोन छोटा खयाल प्रभावीपणे सादर केले. राग जोग सादर करताना ‘पिहरवा कोबेर मायो’ ही रचना सादर करून ‘दे रे न तदानो’ हा तराना ऐकविला. ‘डार डार पात पात बुलाये’ ही काफी कानडीतील रचना ऐकविताना पंडित मुद्‌गल यांनी शब्दांचा भाव जपत रागाचे स्वरूप साकारत नेले. याला जोडून ‘तनन तेरे ना तना दे रे ना दिम’ हा तराना तसेच हिंडोल हा प्रकार ऐकविताना ‘आयी बसंत रितु’ हा इंदोर घराण्यातील खयाल बहारदारपणे सादर करत त्याला जोडून ‘ताना दिड ताना नोम’ हा तराणा सादर केला. भक्तीसंगीतावर विशेष प्रभुत्व असणाऱ्या पंडित मुद्‌गल यांनी मैफलीची सांगता संत कबीर यांच्या ‘आवे न जावे मरे नही जन मे’ या भक्तीरचनेने केली. पंडित मधुप मुद्गल यांनी तालाचे वैविध्य दाखवताना हींडोल रागातील सुरफाक्ता सारख्या तालातील बंदीश सादर करून रसिकांची दाद मिळविली. भावस्पर्शी सादरीकरण आणि स्वरांमधून साकारलेल्या अनोख्या अनुभूतीने रसिक मंत्रमुग्ध झाले. भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), निलेश धाक्रस (तानपुरा) तसेच कुशाल शर्मा (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली.

छोट्या मैफलीतून घडतो कलाकार अन्‌ श्रोत्यांमध्ये संवाद : पंडित सुहास व्यास उद्‌घाटनपर मनोगत व्यक्त करताना पंडित सुहास व्यास म्हणाले, अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत हे देशाचे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. छोटेखानी मैफलीतून शास्त्रीय संगीताचे आयोजन करण्याचे श्रेय मधुकर खांडवे आणि मधुकर हस्तक यांना जाते. छोटेखानी मैफलींचा आनंद वेगळाच असतो. या मैफलींमध्ये गाणे नुसते रंगतच नाही तर श्रोते आणि कलाकारांमध्ये संवाद घडतो.कलाकारांचा सत्कार डॉ. विद्या खांडवे, मोहन खांडवे यांनी केला. आदित्य खांडवे यांनी सूत्रसंचालन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×