Breking News
Pune Police Crime News : बीएसनएलची केबल चोरणारा अटकेतPune Road Accident News : पुण्यात मोटारीच्या धडकेत रिक्षा प्रवासी महिलेचा मृत्यूShivajinagar House Robbery Pune : शिवाजीनगर भागात घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज चोरलाHadapsar Crime News Pune : पुण्यात काळेपडळ, चिंतामणीनगरमध्ये टोळक्याचा राडाAmit Shah Pune Visit : महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाहPune Police Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारे सराईत तडीपारPune Mephedrone Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतBeed District News : दुष्काळ आणि जमिनीच्या वादातून तरूणाची आत्महत्याFarmer ID Registration Maharashtra : कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावाWakdewadi Bus Stand Theft : वाकडेवाडी एसटी स्थानकात महिलेच्या सुटकेसमधून ऐवज चोरीला

ऑटो डीसीआर – महाखनिज प्रणालीमुळे गौण खनिज परवान्यांची प्रक्रिया होणार सुलभ

चाकण एमआयडीसीतील सुविधा व वाहतूक सुधारणांना गती

बांधकाम परवानगीनंतर उत्खनन व वाहतूक परवाने मिळणार तात्काळ

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ मधील तरतुदीनुसार गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी तात्पुरते परवाने देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत ही परवानगी स्वयंचलित विकास नियंत्रण नियम प्रणाली (AUTO DCR)–महाखनिज या एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे दिली जाणार आहे.त्यामुळे गौण खनिज परवानगी अधिक सुलभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

विशेष डिजिटल शेती शाळेचे एप्रिल महिन्यात आयोजन – सविस्तर बातमी

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम परवानगी ही स्वयंचलित विकास नियंत्रण नियम प्रणाली (AUTO DCR) द्वारे दिली जाते. ही प्रणाली महाखनिज (Mahakhanij) पोर्टलशी संलग्न करण्यात आल्यामुळे, बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर पाया खोदाई मधील गौण खनिज उत्खनन व वाहतुकीची परवानगी अर्जदारांना तात्काळ उपलब्ध होणार आहे.

या नव्या प्रणालीमुळे बांधकाम व्यावसायिक व विकासकांना स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. परिणामी, परवानगी प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता व वेग वाढणार आहे. तसेच, महानगरपालिका हद्दीतून शासनाला अंदाजे १५० ते २०० कोटी रुपयांचे स्वामित्वधन प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दिनांक १ एप्रिल २०२६ पासून ही प्रणाली तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून, संबंधित सर्व परवाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत याच प्रणालीद्वारे दिले जाणार आहेत.

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व बांधकाम व्यावसायिक व विकासकांनी या सुलभ प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×