Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली हिंदुत्वाची व्याख्या मार्गदर्शक – डॉ. नीलम गोऱ्हे

बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली हिंदुत्वाची व्याख्या मार्गदर्शक – डॉ. नीलम गोऱ्हे

हिंदुत्वाच्या सर्वसमावेशक व्याख्येची आठवण करून डॉ. नीलम गोऱ्हेंचे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

marathinews24.com

मुंबई – शब्दांनी मनाला भिडणारा संवाद, विचारांनी हक्क आणि स्वाभिमान जागवणारा नेता, धैर्य आणि परखड भूमिकेचे प्रतीक म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांनी हिंदुत्वाची जी व्यापक व्याख्या दिली. ‘जो स्वतःला भारतीय म्हणतो तो हिंदू’ – ती आजही सर्वसमावेशक राष्ट्रवादी विचारधारेची दिशा दाखवणारी ठरते,” असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करताना केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विधान परिषद उपसभापती कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत भावनिक श्रद्धांजली व्यक्त केली.

पुणे ते शिरूर, शेंद्रा ते बिडकीन, बिडकीन ते ढोरेगाव रस्ता निर्मितीला मान्यता – सविस्तर बातमी 

“ बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझा अनेक वर्षांचा परिचय होता. १९९८ पासून त्यांच्या वाढदिवसाला, विजयादशमीला, संक्रांतीला आम्ही भेटायला जात असे. माझी काही पुस्तक प्रकाशने देखील त्यांनी स्वतः केलेली आहेत. मराठी माणसाचा स्वाभिमान, ८०% समाजकारण आणि २०% राजकारण, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याची भूमिका ते दक्षिणेकडचे राजकीय प्रश्न असोत किंवा राष्ट्रीय मुद्दे – बाळासाहेबांचे नेतृत्व सदैव प्रभावी आणि तेजस्वी राहिले,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

“राजकारणात मला संजीवनी देणारे, योग्य संधी आणि दिशा देणारे बाळासाहेब ठाकरे होते. मी त्यांची कायम ऋणी आहे. आजही प्रत्येक स्मृतिदिन, जयंती किंवा महत्त्वाच्या प्रसंगी मी त्यांना अभिवादन करून प्रार्थना करते. त्यांना माझे हजार प्रणाम”, अशी कृतज्ञतापूर्वक आदरांजली डॉ. गोऱ्हे यांनी वाहिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×