Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड

बंडू आंदेकर टोळीतील गुंड गजाआड

मोक्का कारवाईनंतर होता पसार

marathinews24.com

पुणे – माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सराइतांच्या नातेवाईकांच्या घरावर पाळत ठेवणाऱ्या आंदेकर टोळीतील सराइताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. आंदेकर टोळीतील सराइताविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर तो पसार झाला होता.

बारामती तालुक्यातील हजाराहून अधिक दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग भत्याचे वितरण – सविस्तर बातमी 

दत्ता बाळू काळे (वय २४, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा खुनाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांच्या घराच्या परिसरात आंदेकर टोळीतील सराइत दत्ता काळेने पाळत ठेवली होती. प्रतिस्पर्धी टोळीतील सराइत आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खुनाचा कट आंदेकर टोळीने रचला होता. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आंदेकर टोळीतील सराइतांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर काळे पसार झाला होता. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते.

काळे लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाच्या परिसरातील उड्डाणपुलाजवळ थांबला होता. याबाबतची माहिती पोलीस कर्मचारी महेश बारावकर, मंगेश पवार यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून काळेला पकडले. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांनी ही कारवाई केली

वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात गणेश कोमकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर बंडू आंदेकरने आयुषच्या खुनाचा कट रचला होता. अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. आयुष कोमकर खून प्रकरणात या प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०) याच्यास साथीदारांना अटक करण्यात आली. आंदेकरसह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ करवाई करण्यात आली होती. आंदेकर टोळीविरुद्ध खंडणी, बेकायदा फलक लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जमीन व्यवहारात फसवणूक केल्या प्रकरणी बंडू आंदेकरसह बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध उत्तमनगर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×