Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Baner Murder Case : दोघांत मध्यस्थी करणार्‍या तरुणाचा भोसकून खून

Fursungi Murder Case

पुण्यातील बाणेरमधील घटना, टोळक्याविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – Baner Murder Case : मित्राला दिलेले उसने पैसे परत मागण्यावरून झालेल्या वादात दोघांमध्ये मध्यस्थी करणार्‍या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. ११) रात्री साडेअकराच्या सुमारास पाषाणमधील आयटीआय ग्राऊंडसमोर घडली. सहदेव रामप्रकाश शर्मा (वय ३३, रा. सुसगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंटी उर्फ आशिष चक्रनारायन याच्यासह तिघांवर गुन्हा नोंद झाला आहे. कृष्णा रामप्रकाश शर्मा (वय ३६, रा. सुसगांव) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रविवार पेठेत घरफोडी; दोन लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनसार, सहदेव हा शेअर मार्वेâटिंगचे काम करत होता. सहदेवचा मित्र ज्ञानेश्वर भोई याने आरोपी बंटी चक्रनारायन याच्याकडून ३ लाख रुपये हातउसने घेतले होते. मात्र, ते पैसे परत देण्यावरून त्यांच्यात वादविवाद सुरू होते. Baner Murder Case त्यांच्यातील पैशांच्या व्यवहारात मित्र सहदेव मध्यस्थी करत होता. सहदेव आणि ओंकार हे रविवारी रात्री साडे आकराच्या सुमारास आयटीआय ग्राउंड परिसरात फेरफटका मारत होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी गेले. त्यांनी मध्यस्थी सह आरोपी च्या कुटुंबाबद्दल सहदेवने अपशब्द वापरल्या च्या गैरसमजातून त्याच्याशी वाद घातला.

टोळक्याने त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. सहदेवने आरोपींना प्रतिकार केल्यानंतर आरोपींनी तीक्ष्ण शस्त्राने त्याच्यावर वार केले. त्याला भोसकून गंभीररित्या जखमी केले. सहदेव रस्त्यावर पडल्यानंतर त्याला ओढत फुटपाथवर नेऊन टोळक्याने लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत सहदेव गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरू असताना सहदेवचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती बाणेर पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×