पुण्यात पीएमपीएल बसमध्ये बांगडी कटींग टोळीचा धुमाकूळ

जेष्ठ महिलांना केले जातेय लक्ष्य

marathinews24.com

पुणेb– शहरातील विविध भागातील नागरिकांची प्रवासवाहिनी असलेल्या पीएमपीएल बसमध्ये बांगडी कटींग टोळीने धुमाकूळ घातला आहे. गर्दीच्या ठिकाणांवर सावज हेरून त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कापून नेण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून, बांगडी कटींग टोळीचा अटकाव करण्याची मागणी प्रवाशांसह नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, वारंवार घडणार्‍या घटनांनंतरही पीएमपीएल प्रशासन ढिम्म असल्याचे दिसून आले आहे.

रिक्षा पार्किंगच्या वादात रिक्षाचालकाने केले वार – सविस्तर बातमी

पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी ६९ वर्षीय महिलेच्या हातातील तब्बल दीड लाख रूपये किंमतीची सोन्याची बांगडी कापून नेली. ही घटना ११ जूनला दुपारी दोनच्या सुमारास पुण्यातील मध्यवर्ती भिकारदास मारूती चौक ते शनिपार प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी वडगाव बुद्रूक परिसरात राहणार्‍या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला वडगाव बुद्रूकमध्ये राहायला असून, ११ जूनला दुपारी दोनच्या सुमारास भिकारदास मारूती चौक ते शनिपार प्रवास करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील दीड लाख रूपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या कापून नेल्या. काही वेळानंतर महिलेला हातात बांगड्या नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

दरम्यान, गर्दीच्या नावाखाली संबंधित टोळीच गलका करीत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण करीत लुटमार करीत आहे. त्यामुळे महिलांनी बसप्रवास करण्यास नापसंती दर्शविली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार माने तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×