रिक्षा पार्किंगच्या वादात रिक्षाचालकांनी केला वार…

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दोघा रिक्षाचालकांना अटक

marathinews24.com

पुणे – रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्यावरुन झालेल्या भांडणाच्या वादाचा राग मनात धरुन दोघांनी रिक्षाचालकावर हत्याराने वार गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. विश्रांतवाडी पोलिसांनी दोघा रिक्षा चालकांना.अटक केली आहे. नरेश रामंचद्र तिडंगे (वय ४०, रा. विश्रांतवाडी) हे गंभीर जखमी झाले असून
त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पुण्यात डिलिव्हरी बॉयला पिस्तूल लावून लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी परशुराम राजू मानिके (वय २१), नागेश मानिके (वय १९, दोघे रा. भिमनगर, विश्रांतवाडी) यांना अटक केली असून त्यांच्या साथीदारावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धानोरीतील साईधाम सोसायटी येथे ११ जून रोजी रात्री सव्वा आठ वाजता घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे रिक्षाचालक आहेत. त्यांचा ११ जून रोजी सायंकाळी रिक्षा स्टँडला रिक्षा लावण्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर नरेश तिडंगे हे पॅसेजर घेऊन धानोरी येथील साईधाम सोसायटीत गेले होते. पॅसेजरला सोडल्यानंतर ते परत येत असताना वाटेत तिघांनी त्यांना गाठले. सायंकाळी झालेल्या वादाच्या रागातून त्यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हत्याराने त्यांच्या हातावर, पायावर, शरीरावर इतरत्र वार करुन गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक. पदमराज गंपले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×