Breking News
पुणे जिल्ह्यात ३ ठिकाणी होणार मॉकड्रिल,ब्लॅक आउट नाहीगांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या सराईताला अटक, वानवडी पोलिसांची कामगिरीपुण्यात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणार मॉकड्रील – सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची माहितीसायबर चोरट्यांकडून तरुणाची पावणे पाच लाखांची फसवणूकपर्यटक महिलेच्या पिशवीतून दागिन्यांची चोरीबसस्थानकात महिलेचे १ लाखांचे मंगळसूत्र हिसकावलेपुणे : तरुणाच्या खूनप्रकरणी दोघांना अटकट्रकला धडकल्यामुळे दुचाकीस्वार ठारबायकोचा खून केला, दुचाकीवर मृतदेह नेताना रंगेहात पकडलाअहिल्यानगर-चौंडी येथे होत असलेल्या मंत्रीपरिषद बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजर राहणार

ऑनलाइन गेमच्या नादात रिकामे झाले बँकखाते

पुण्यातील कोथरूडमधील तरुणाची ३९ लाखांची फसवणूक

Marathinews24.com

पुणे – ऑनलाइन गेमच्या नादात कोथरूडमधील तरुणाने स्वतःचे बँक खाते रिकामे केले आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाची तब्बल ३९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ३० वर्षीय तरुणाने ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

इंडो-जर्मन सहकार्याने मराठी चित्रपटाची होणार निर्मिती – सविस्तर बातमी

तक्रारदार तरुण कुटुंबियांसह कोथरूड भागात राहायला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याला एका ऑनलाइन गेमचा मेसेज सायबर चोरट्यांनी पाठविला. त्यानंतर तरुणाने संबंधित वाचून ऑनलाइन गेम डाऊनलोड करीत नावनोंदणी केली. सावज जाळ्यात अडकविण्यासाठी सायबर चोरट्यांनी तरुणाला सुरुवातीला गेम खेळताना १० हजार रुपये गुंतविण्यास भाग पाडले. पहिल्यांदा गेम खेळताना तो दहा हजार रुपये हरल्यानंतर त्याने पुन्हा १० हजार रुपये गुंतविले. टप्याटप्याने त्याने जवळपास पावणेसहा लाख रुपये गुंतविले. गेम खेळताना त्याला १ लाख रुपयांचा नफा झाला. पैसे मिळाल्यानंतर त्याने आणखी पैसे गुंतविले. गेल्या पाच ते सहा महिन्यात त्याने ३९ लाख ७७ हजार रुपये गुंतविले होते. ऑनलाइन गेमच्या नादात त्याने मोठी रक्कम गमावली. त्यानंतर त्याने नुकतीच कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

झटपट पैसे कमाविण्याचा नाद वाईट

मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेल्या ऑनलाइन गेममध्ये विमान हवेत उड्डाण करते. जेवढ्या वेळ विमान हवेत उड्डाण करेल. तेवढे गुण (बेटींग पाँईंटस्) जास्त मिळतात. अनेक तरुण झटपट पैसे कमाविण्याच्या नादात या गेमच्या जाळ्यात सापडले आहेत. संबंधित गेमची जाहिरात एका क्रिकेटपटूने केली आहे. त्यामुळे तरुण गेमकडे आकर्षित झाले आहेत. अशा प्रकारच्या ऑनलाइन गेमच्या जाळ्यात सापडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top