Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील बँकेची फसवणूक

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील बँकेची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गु्न्हा

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांकडून जंगली महाराज रस्त्यावरील बँकेची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘आरटीजीएस’ सुविधेद्वारे बँकेतील कर्मचारी महिलेला तातडीने पैसे पाठविण्यास सांगून फसवणूक केली. याबाबत बँक कर्मचारी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनकवडीत दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’कारवाई – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुुसार, तक्रारदार महिला एका बँकेच्या जंगली महाराज शाखेत कामाला आहेत. गेल्या महिन्यात तक्रारदार बँक कर्मचारी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. ‘आरटीजीएस सुविधेद्वारे बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले आहे. मात्र, अजून ही रक्कम पाठविण्यात आली नाही’, असे चोरट्यांनी महिलेला सांगितले. चोरट्यांनी या बँकेतील एका खातेदाराचा क्रमांक ‘आरटीजीएस’ सुविधेसाठी दिला होता. त्यानंतर सायबर चोरट्यांच्या खात्यात तातडीने साडेआठ लाख रुपयांची रक्कम पाठविण्यात आली. मात्र, ज्या खात्यातून ही रक्कम सायबर चोरट्यांच्या खात्यात जमा झाली होती. त्या खातेदाराने बँकेशी संपर्क साधला. ‘आरटीजीएस सुविधेद्वारे आम्ही पैसे पाठविण्यास सांगितले नव्हते. आमच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात साडेआठ लाख रुपये हस्तांतरित कसे करण्यात आले ?’, असा प्रश्न संबंधित खातेदाराने उपस्थित करण्यात आला. शहानिशा करण्यात आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

ज्येष्ठाची ८ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांक ‘हॅक’ (तांत्रिक ताबा) करून बँक खात्यातून सात लाख ९६ हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रादार ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. , तक्रारदार ज्येष्ठाचा मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला आहे. सायबर चोरट्यांनी ज्येष्ठाच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठविली. ही लिंक उघडल्यानंतर चोरट्यांनी मोबाइल क्रमांक ‘हॅक’ केला.

ज्येष्ठाच्या बँक खात्यातून चोरट्यांनी रोकड लांबविली. खात्यातून रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत. अनोळखी क्रमांकावरून लिंक पाठविल्यास चोरट्यांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मोबाइल क्रमांक हॅक करुन बँक खात्यातून रोकड चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×