Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

धनकवडीत दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’कारवाई

नारी शक्ती वंदन अधिनियमासाठी उद्यापासून संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन

यवतमाळ कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध

marathinews24.com

पुणे – शहरातील धनकवडी परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. आदेशानुसार गुंडाची रवानगी यवतमाळ कारागृहात केली आहे. रोहन राजेंद्र रोेंगे (वय २१, रा. गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. रोंगे याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती.

बीड जिल्ह्यात १४ एप्रिलला डीजेच्या मोठ्या आवाजावर बंदी – सविस्तर बातमी 

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच मंजूरी दिली. त्यानुसार रोंगे याची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. वर्षभरासाठी त्याला कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.

पोलीस उपायुक्त मोहिते, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, सहायक निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, बापू खुटवड, अमोल पवार, विनायक एडके, गोरख ढगे, योगेश ढोले, सागर सुतकर यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×