वाघोली पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – हडपसरमध्ये बँकेत चोरीचा प्रयत्न – मांजरी भागात असलेल्या एका बँकेत शिरून चोरीचा प्रयत्न उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बँक व्यवस्थापक शुभम ब्रजकिशोर शर्मा (वय ३७) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळशीबागेत महिलेच्या पर्समधील दागिने लंपास – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हडपसरमधील मांजरी खुर्द भागात एका इमारतीत कॅनरा बँकेचे कार्यालय आहे. तळमजल्यावर असलेल्या बँकेच्या दरवाज्याचे कुलूप चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री ताेडले. चोरटे बँकेच्या शाखेत शिरले. चोरट्यांनी बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. तिजोरी फोडता न आल्याने बँकेतील कागदपत्रे फेकून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेेले चित्रीकरण तपासले असून, पोलीस हवालदार गोगे तपास करत आहेत.