Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध तपासणी मोहीम

Baramati Drink and Drive Checking

बारामतीत ‘ड्रिंक अँड ड्राइव्ह’विरोधात विशेष मोहीम

marathinews24.com

बारामती – उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकांमार्फत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष “Drink and Drive” तपासणी मोहीम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

पुण्यात गोळीबाराची दुसरी घटना; काेंढव्यात तरुणावर गोळीबार – सविस्तर बातमी 

या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी वाहनचालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. एकूण ३१ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळलेल्या ६ वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली.

मद्यप्राशन केल्यानंतर वाहन चालविल्यास वाहनचालकाची निर्णयक्षमता, प्रतिक्रिया देण्याचा वेग आणि वाहनावरील नियंत्रण कमी होते. त्यामुळे गंभीर व प्राणघातक अपघात होण्याचा धोका वाढतो. मद्यप्राशन करून वाहन चालविणे हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून स्वतःसह इतर रस्ता वापरकर्त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण करणारे आहे.

मद्यप्राशन करुन वाहन चालवू नये. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी अथवा मद्यप्राशन न केलेल्या वाहनचालकाची मदत घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी व मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी “Drink and Drive” विशेष तपासणी मोहीम यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे. विविध ठिकाणी अचानक तपासणी करण्यात येऊन नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निकम यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×