Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Baramati Medical College : बारामती येथे वैद्यकीय महाविद्यालयात ‘व्हाईट कोट’ समारंभ उत्साहात संपन्न

Baramati Medical College

प्रथम वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना रुग्णसेवा, मानवता आणि वैद्यकीय नैतिकतेचे महत्त्व पटवून दिले

marathinews24.com

बारामती – Baramati Medical College : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे प्रथम वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ‘व्हाईट कोट’ समारंभ उत्साहात संपन्न झाला. वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व्यवसायातील जबाबदाऱ्या, नैतिक मूल्ये, रुग्णसेवेचे महत्त्व आणि मानवतावादी दृष्टिकोन यांची जाणीव करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

परदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना २ नोव्हेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वैद्यकीय शिक्षणात केवळ शैक्षणिक ज्ञान व तांत्रिक कौशल्ये महत्त्वाची नसून संवेदनशीलता, सहानुभूती आणि माणुसकीही तितकीच आवश्यक आहे. रुग्णांच्या वेदना समजून घेणे, त्यांच्याशी आदराने वागणे आणि त्यांच्या भावनांचा सन्मान करणे ही प्रत्येक डॉक्टरची मूलभूत जबाबदारी आहे.

‘व्हाईट कोट’ हा केवळ वैद्यकीय व्यवसायाचा पोशाख नसून रुग्णांप्रती असलेली बांधिलकी, प्रामाणिकपणा, सेवाभाव, शिस्त आणि नैतिक जबाबदारी यांचे प्रतीक आहे, असे अधिष्ठाता डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा, गरीब व गरजू रुग्णांची सन्मानपूर्वक सेवा करावी आणि आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी पालक-शिक्षक बैठकीत महाविद्यालयामध्ये रॅगिंगविरोधी उपाययोजना, रॅगिंग प्रतिबंधक नियम, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, तक्रार नोंदविण्याची व्यवस्था तसेच महाविद्यालयातील सकारात्मक व सन्मानपूर्ण वातावरणाचे महत्त्व याबाबत पालकांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालय आणि पालक यांच्यात नियमित संवाद व समन्वय आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास उपअधिष्ठाता (पदव्युत्तर विभाग) डॉ. नकाते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमाप, कार्यक्रम समन्वयक डॉ. सुदके, महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, निवासी डॉक्टर, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

‘व्हाईट कोट’ परिधान करताना विद्यार्थ्यांनी रुग्णसेवा, मानवता, प्रामाणिकपणा आणि वैद्यकीय व्यवसायातील नैतिक मूल्ये जपण्याचा संकल्प केला. या समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये रुग्णांप्रती सहानुभूती, सेवाभाव आणि व्यावसायिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली. याचवेळी डॉ. स्नेहा साठे व त्यांच्या टीमच्या वतीने पालक-शिक्षक संघटनेची बैठकही संपन्न झाली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×