जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांचे आवाहन
marathinews24.com
पुणे – Farmers Foreign Study Tour : राज्य शासनाच्या सन २०२६-२७ मधील शेतकऱ्यांसाठीच्या परदेश अभ्यास दौरा योजनेंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांनी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथील महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळ कार्यालयातील पाठीमागील इमारत, शिवाजीनगर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
सांस्कृतिक वारसा संवर्धनाच्या नव्या पर्वाचा ‘बाप्पाचा कट्टा’ – सविस्तर बातमी
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना युरोप आणि चीन या देशांमधील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. युरोपमध्ये फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धव्यवसाय, तर चीनमध्ये विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आणि कृषी प्रदर्शनांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या या योजनेंतर्गत एक महिला शेतकरी, एक राज्य व केंद्र शासन पुरस्कारप्राप्त शेतकरी आणि इतर शेतकरी अशा विविध गटांतून निवड करण्यात आली आहे. (Farmers Foreign Study Tour) महिला शेतकरी गटातून १ महिला शेतकरी, १ राज्य व केंद्र शासन पुरस्कारप्राप्त गटातून शेतकरी, ३ इतर शेतकरी असे एकूण ५ शेतकरी निवडीचा लक्षांक प्राप्त झालेला आहे. यावर्षीच्या अभ्यास दौऱ्यासाठी १५८ पात्र अर्ज जिल्हास्तरावर प्राप्त झाले असून त्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी निर्धारित वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.























