Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

तरुणीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून आरोप पसार

marathinews24.com

पुणे – ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उडकीस आली. तरुणीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून आरोप पसार झाला. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आफरीन सलीम पठाण (वय २९, सध्या रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत आफरीनची लहान बहीण अरबिना सय्यद (वय २४, सध्या रा. वडगाव शेरी, मूळ रा. खुडुसवाडा, चिंचघर, जि. पालघर) हिने ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दारू पितााना झालेल्या वादातून तरुणाचा खून – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफरीन हिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. महिला ग्राहकांनी तिच्याशी संपर्क साधल्यानंतर ती घरी जाऊन ब्युटीपार्लरविषयक कामे करते. मंगळवारी (५ मे) सायंकाळी ती एका महिला ग्राहकाकडे कामाला गेली होती. तिचा मृतदेह मुंढव्यातील केशवनगर परिसरातील कचरा डेपोजवळ असलेल्या रस्त्यावर सापडला. नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सुरुवातीला पोलिसांना अपघाताची घटना वाडली. वाहनाने तिला धडक दिल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनात तरुणीचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले. पाेलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. केशवनगर कचरा डेपोजवळ असलेल्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक सागर गोडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×