Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत काँवतांचे मानवतेचे दर्शन

बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत काँवतांचे मानवतेचे दर्शन

अपघातातील जखमींना स्वतः रुग्णालयात केले दाखल, जखमींना मिळाले जीवनदान

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जात असताना त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ वाहन थांबवून घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच्या वाहनातून जखमींना गेवराईत खासगी रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने जखमींची प्रकृती स्थिर आहे. सोलापूर धुळे राज्य महामार्ग गेवराई शहारा जवळ दि. १९ एप्रिलला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि कार भीषण अपघात झाला होता. अपघातात कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले.

पुण्यात मू्ल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल – सविस्तर बातमी 

रात्रीची वेळ असल्याने जखमींना मदत करण्यासाठी कोणतेही वाहन थांबत नव्हते. एसपींच्या तत्पर आणि संवेदनशील कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अपघातात गणेश बाबूराव शेवाळे, त्यांची पत्नी शीतल शेवाळे आणि मुलगी प्रियदर्शिनी हे गंभीर जखमी झाले असून मुलगा साई किरकोळ जखमी झाला आहे. हे कुटुंब छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे कारने (एमएच-१२ एसक्यू २९८९) प्रवास करत होते. दरम्यान, जळगावकडे जाणारा ट्रक (एमएच-२० ईजी ७६६६) विरुद्ध दिशेने येऊन कारला धडक दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके यांच्यासह इतर पोलिस कर्मचारीही दाखल झाले होते. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिस अधीक्षक पुढील प्रवासासाठी बीडकडे रवाना झाले. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या तत्परतेमुळे अपघातातील जखमींचे प्राण वाचले असून मानवतेचे दर्शन घडले आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक कॉवत यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×