बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून कौतुकाची थाप
marathinews24.com
बीड – जिल्ह्यातील कृष्णा गायकवाड या मुलाने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून बीड जिल्हाची मान उंचावली आहे .जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा होतकरू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या कृष्णाने बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नावलौकिक करत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत १४ वर्षांखालील (अंडर-१४) महाराष्ट्र क्रिकेट संघात जाण्याचा बहुमान मिळवला आहे. कृष्णाची नुकतीच अंडर-१४ महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली असून, या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे क्रीडा क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदनाचा आणि शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
कृष्णा गायकवाडने सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राज्य संघात स्थान मिळवले आहे. कृष्णाच्या या यशाबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर, सचिव आमेर सलीम यांच्यासह महेश वाघमारे,राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिजवान खान, जैतुल्ला खान, सिद्दीक देशमुख, संजय उडान, शुभम धुत, शेख आरेफ, अतीक कुरेशी, सुनील गोपी शेट्टी, गोपाल गुरखूदे, सरफराज मोमीन, अक्षय नरवडे, पठाण शाहरुख या पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची निवड बीड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असून, भविष्यात तो राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.




















