Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

Bharati Vidyapeeth Police : पुण्यात अल्पवयीन आरोपींची धिंड काढणे भोवले

Bharati Vidyapeeth Police

तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलांना बेकायदेशीरपणे डांबुन ठेवणे, आरोपींची धिंड काढून त्यांना माफी मागण्यास लावण्याच्या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे (Bharati Vidyapeeth Police) तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह १३ पोलिसांवर अ‍ॅट्रोसिटीसह दोन गुन्हे दाखल झाले आहेत. खुनाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांना डांबुन ठेवून त्यांना पोलीस व्हॅनच्या बोनेटवर बसवुन धिंड काढल्याप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस असल्याच्या बतावणीने गंडा, पुण्यात आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी 

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह १३ पोलिसांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. त्यात अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा ही समावेश आहे. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक आण्णा मधुकर दराडे, निलेश राजेंद्र मोकाशी, पोलीस हवालदार सुनिल दादा हनवते, पोलीस अंमलदार सागर चंद्रकांत बोरगे, सोहम कैलास शेंडकर, राहुल अशोक औंधकर, मितेश दत्तात्रय चोरमोले, रवींद्र शंकर गायकवाड, संदीप लक्ष्मण आगळे, पोलीस उपनिरीक्षक फकीर, पोलीस अंमलदार सुतार व पवार अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसआरए कॉलनीतील पार्किंग एरियामध्ये ५ ते ९ जुलै दरम्यान घडली होती.

Bharati Vidyapeeth Police ठाण्याच्या आवारात घडलेल्या घटनेची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने सुमोटो दखल घेतली होती. याबाबत आयोगाच्या फॅक्ट फाईडिंग रिपोर्टमधील नोंदविलेली निरीक्षणे व निष्कर्षाच्या आधारे सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक संकेत सतिश गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी ५ जुलैला दुपारी शरण आले होते. यातील आरोपीचा आयोगाने नोंदविलेल्या जबाबाप्रमाणे मानसिंग पाटील व इतर पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी पट्याने हातावर व पायावर मारहाण केली. त्यांना एसआरए कॉलनीत नेण्यात आले. तेथील घटनेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले. चित्रिकरणात चारही आरोपींना पोलिसांनी गुडघ्यावर बसवुन रस्त्यावर चालण्यास भाग पाडले. आरोपींच्या पायावर पोलिसांकडून काठ्या व लाठ्यांनी मारले आहे.

आरोपींना सार्वजनिकरित्या अपमानित करुन त्यांना सर्व नागरिकांसमोर गुघड्यावर बसवुन हात जोडून माफी मागण्यास भाग पाडले होते. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी आरोपींना आपले घर सोडून त्या भागाबाहेर निघून जाण्याची धमकी दिली़ तसेच पोलीस ठाण्यात त्यांना मारहाण केली़ मात्र याची जनरल डायरी व पोलीस वाहनांचे लॉग बुकमध्ये कोणतीही नोंद केलेली दिसून येत नाही. चारही आरोपींना मारहाण होऊनही वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये दुखापतीबाबत नोंदी घेतल्याचे दिसून येत नाही.

तथापी एका आरोपीच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत असल्याचे आढळून येते. आयोगाने नोंदविलेल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे जबाबामधून या घटनेला पुष्टी मिळते. त्या पोलिसांनी ते स्वत: घटनास्थळी उपस्थित असल्याची कबुली दिली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील असल्याचे ओळखले असून मानसिंग पाटील हे घोषणा देत असल्याबाबत पोलिसांनी निश्चित केले. बेकायदेशीर कृत्यांसाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२) (इच्छापूर्वक दुखापत पोहचवणे), १२७ (२) गैर परिरोध), १२७ (३) (गैरपरिरोध), १३१ (गंभीर प्रक्षोभ कारण नसताना एरव्ही अमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग), ३५२ (शांतताभंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे), ३५१ (२) फौजदारी पात्र धाकदपटशा), १९८ (कोणत्याही व्यक्तीला क्षती पोहचविण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे) व १९९(लोकसेवकाने कायद्यान्वये दिलेल्या निदेर्शाची अवज्ञा करणे) अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.

दुसरी घटना आंबेगाव पठार पोलीस चौकीमध्ये २० व २१ जुलै २०२६ दरम्यान घडली होती. सीआयडीने दिलेल्या फिर्यादीनुसार, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते, स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश राजेंद्र मोकाशी, पोलीस हवालदार सुनिल हनवटे, दिनेश टापके, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर चंद्रकांत बोरगे, सोहम कैलास शेंडकर, मंगेश पवार आणि सवर्णा दत्तात्रय भिसे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राज्य मानवी हक्क आयोगाच्या फॅक्ट फायडिंग रिपोर्ट पार्ट २ मधील नोंदविलेली निरीक्षक व निष्कष याच्या आधारे ही फिर्याद दिली आहे. २० जुलैला रात्री भारती विद्यापीठ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ४ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात घेऊन आंबेगाव पठार पोलीस चौकी येथे बेकायदेशीरपणे ठेवले. त्यानंतर २१ जुलैला सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात यांच्या अहवाल व फिर्यादी गणेश रामदास चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित अल्पवयीन मुले व इतर ४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

बाल कल्याण पोलीस अधिकारी नसताना सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते यांना तपास देण्यात आला. २१ जुलैला चार आरोपींना आंबेगाव पठार पोलीस चौकी येथून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आणुन बेकायदेशीररित्या पोलीस कोठडीत ठेवले. तसेच २१ जुलैला रात्री साडेआठ वाजता तिघा आरोपींना व २२ जुलैला दुपारी १२ वाजता आठवा आरोपी यांना ताब्यात घेऊन बेकायदेशीररित्या पोलीस कोठडीत ठेवले. त्यानंतर २५ जुलैला ८ जणांना बाल न्यायमंडळासमोर हजर केले.

त्यावरुन Bharati Vidyapeeth Police यांनी पहिल्या ७ आरोपींना ३ दिवसांपेक्षा अधिक व आठव्या आरोपीला २४ तासांपेक्षा अधिक काळ बेकायदेशीररित्या पोलीस कोठडीत ठेवले. या दरम्यान, त्यांचा ताबा गणवेशधारी पोलिसांनी अधिकारी व अंमलदार यांच्याकडे असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज व उपलब्ध व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये दिसून येत आहे. या आरोपींचा बेकायदेशीर ताबा असताना त्यांना बांबु व बॅटनने मारहाण करण्यात आल्याचे या आरोपींनी आयोगासमोर दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×