बाणेर पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – पोलीस असल्याची बतावणी करीत (Fake Police ID Fraud) नागरिकांकडून पैसे घेणार्या तोतयाला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २३ सप्टेंबरला सकाळी अकराच्या सुमारास बालेवाडीतील लक्ष्मीनगरात उघडकीस आली. वैभव संतोष भोंग (वय २५ रा. पिसेवाडी, माळशिरस, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस अमलदार मनोज देशमुख यांनी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
जुन्या वादातून तरुणावर वार, दोघांना अटक – सविस्तर बातमी
Fake Police ID Fraud पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव भोंग हा शासकीय सेवेत नसतानाही त्याने महाराष्ट्र पोलीस दलाचे बनावट ओळखपत्र तयार केले होते. संबंधित ओळखपत्र लोकांना दाखवून पोलीस असल्याचे सांगत होता. त्यांना आमिष दाखवून तो पैसे उकळत होता. याप्रकरणी गोपनीय माहितीनुसार आरोपी वैभवला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखडे तपास करत आहेत.
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला
ढोल-ताशा पथकाचे वादन पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरुन नेले आहे. ही घटना १४ सप्टेंबरला दुपारी बाराच्या सुमारास बुधवार पेठेतील प्रकाश डिपार्टमेंट जवळ घडली आहे. याप्रकरणी मांजरी बुद्रूक परिसरात राहणार्या ३२ वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फियाद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मांजरी बुद्रूक परिसरात राहायला असून, १४ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास त्या बुधवार पेठ परिसरात आल्या होत्या. त्यावेळी तिथे ढोल-ताशा पथकाकडून वादन सुरू होते. त्यामुळे तक्रारदार महिला वादन पाहत थांबल्या होत्या. परिसरात गर्दीचा फायदा घेउन चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेले. याप्रकरणी महिलेने उशिरा तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शीतल दळवी तपास करीत आहेत.




















