जनता वसाहतीतील दोघांना पर्वती पोलिसांकडून अटक
marathinews24.com
पुणे – Pune Crime : जुन्या वादातून तरुणावर लोखंडी शस्त्राने वार करुन जीवघेणा हल्ला केल्याची घटना २० सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास निलायम थिएटर जवळ घडली आहे. याप्रकरणी दोघा हल्लेखोरांना पर्वती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शाहीद मकबुल कोल्लुर (वय १९ रा. जनता वसाहत) इन्तियाज शकील शेख (वय २२, रा. जनता वसाहत, दांडेकर पूल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.२० वर्षीय तरुणाने फिर्याद दाखल केली आहे.
महापालिकेच्या व्यायाम शाळेतून साहित्य चोरी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण जनता वसाहतीत राहायला असून, काही दिवसांपुर्वी त्याचे संबंधित आरोपींसोबत भांडण (Pune Crime) झाले होते. त्याच रागातून दोघाजणांनी २० सप्टेंबरला संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास तक्रारदाराला निलायम थिएटर जवळ गाठले. त्याला बेदम मारहाण करीत लोखंडी शस्त्राने वार करुन जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी धाव घेतली. आरोपींना अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले तपास करीत आहेत.
मारहाण करणार्या आरोपीला अट
Pune Crime तरुणाला धारदार हत्याराचा धाक दाखवून त्याला मारण्यासाठी मागे पळत असताना आरोपीला अडवून एकाने मध्यस्थी केली. त्यावेळी आरोपीने त्याला मारहाण करीत महिलेलाही मारल्याची घटना २३ सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास गुलटेकडी परिसरात घडली. याप्रकरणी हल्लेखोराला स्वारगेट पोलिसांन अटक केली आहे. भक्तीसिंग दीपकसिंग दुधाणी (वय २९ रा. डायसप्लॉट, गुलटेकडी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पवार तपास करीत आहेत.




















