विश्रांतवाडीतील घटना
marathinews24.com
पुणे – महापालिकेच्या व्यायाम शाळेतून चोरट्यांनी आठ हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेल्याची घटना विश्रांतवाडी (Vishrantwadi Theft) भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिकेच्या क्रीडा विभागातील कर्मचारी महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
‘आरटीओ’च्या नावे बनावट चलन पाठवून ३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
Vishrantwadi Theft पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या क्रीडा विभागाचे व्यायाम शाळा विश्रांतवाडी परिसरात आहे. या परिसरात महापालिकेचा नानासाहेब परुळेकर जलतरण तलाव आहे. आवारात व्यायाम शाळा आहे. चोरट्यांनी व्यायाम शाळेच्या तुटलेल्या खिडकीतून आत प्रवेश केला. व्यायाम शाळेतून साडेआठ हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करत आहेत.
कात्रज भागात घरफोडी
सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि कुटुंबीय हे मांगडेवाडीतील स्वप्नशिल्प सोसायटीत राहतात. २१ सप्टेंबर रोजी तक्रारदार आणि कुटुंबीय हे सकाळी अकराच्या सुमारास सदनिका बंद करुन बाहेर पडले. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले.कपाटातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. दुपारी दोनच्या सुमारास तक्रारदाराचे कुटुंबीय घरी परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.




















