Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान

२७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’; अभियानाचा लाभ घेण्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

marathinews24.com

मुंबई – विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत २७, २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यात विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. शिवाय हे अभियान नियमित प्रत्येक तिमाहीच्या पहिल्या मंगळवारी घेण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र नागरिकांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

जलसंपदा विभागातील अभियंत्यांच्या अनुभवाचा जलव्यवस्थापनासाठी उपयोग करावा-राधाकृष्ण विखे पाटील – सविस्तर बातमी 

या अभियानासाठी महसूल विभाग, योजनांशी संबंधित विविध शासकीय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना आणि मूलभूत हक्कांशी संबंधित कागदपत्रांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा अभियानाचा उद्देश आहे.

अभियानात आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी अथवा अधिवास दाखला, विवाह नोंदणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यासह विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी संबंधित यंत्रणा शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहेत.

शिबीरापूर्वी वस्तीस्तरावर लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तत्काळ वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील विविध विभागांचे सक्षम अधिकारी शिबिरांना उपस्थित राहणार आहेत.

अभियानाचे उद्घाटन संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असून स्थानिक खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. जिल्हाधिकारी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय साधतील. शिबिरांचे ठिकाण आणि वेळ याबाबतची माहिती संबंधित जिल्हा व तालुका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×