Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

भेळ विक्रेत्याच्या मुलीचे एअर इंडियामध्ये इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार!

चंद्रकांतदादा पाटील यांची मदत ठरली मोलाची; कोथरुडमधील दत्तात्रय इंगवले यांच्या कन्येची एअरक्राफ्ट मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून नागपुरात नियुक्ती

marathinews24.com

पुणेआर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मोठे स्वप्न पाहणाऱ्या कोथरुडमधील एका तरुणीचे मॅकेनिकल इंजिनिअर होण्याचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. सुतारदरा परिसरातील भेळ विक्रेते दत्तात्रय इंगवले यांच्या कन्या गायत्री एअर इंडियामध्ये मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून नियुक्ती झाली असून, तिच्या शिक्षणाच्या वाटचालीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मदतीचा हात मोलाचा ठरला.

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या कायापालटासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोडमॅप – सविस्तर बातमी

दत्तात्रय इंगवले हे भेळ विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांच्या कन्येने मॅकेनिकल इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मात्र, आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेणे तिच्यासाठी आव्हानात्मक ठरत होते.

याच काळात राज्य सरकारच्या मुलींना उच्च शिक्षण मोफत या निर्णयामुळे तिच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. तसेच, चंद्रकांतदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मिळालेल्या मदतीमुळे तिला शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळाले. या संधीचा योग्य उपयोग करत तिने अभियांत्रिकीचे शिक्षण शिवणे येथील ‘विंग्स कॅालेज ॲाफ एव्हिएशन टेक्नॅालॅाजी’ ह्या महाविद्यालयातून पूर्ण केले आणि आता नागपूर मध्ये एअर इंडियामध्ये एअरक्राफ्ट मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

दरम्यान, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इंगवले कुटुंबीयांची चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी अनपेक्षित भेट झाली. यावेळी कन्येच्या यशाबद्दल तिच्या पालकांनी दादांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या कुटुंबातील मुलीला शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याची संधी मिळाल्याने इंगवले कुटुंबीयांसाठी हा क्षण विशेष ठरला.

“आर्थिक परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य वेळी मिळालेली मदत आणि शिक्षणाची संधी एखाद्याचे आयुष्य बदलू शकते,” याचे हे उदाहरण असल्याची भावना यानिमित्ताने कोथरुड मध्ये व्यक्त होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×