Breking News
दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई 

marathinews24.com

पुणे – राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाच्या भरारी पथकाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत सासवड गावच्याहद्दीत वीर फाटा जेजुरी-सासवड रोड, पुरंदर येथे १ कोटी ३३ लाख ७८ हजार ४०० रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे,अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.

एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूक – सविस्तर बातमी 

याबाबत सासवड विभागाच्या पथकाने सापळा रचून संशयित वाहन टाटा कंपनीचा एलपीटी (१२१२) सहाचाकी माल वाहतूक कंटेनर क्र. MH-४९-एटी-३४७१ वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्य बनावटीचे रॉयल ब्लु माल्ट व्हीस्की मद्याचे १८० मि.ली क्षमतेच्या प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या या प्रमाणे एकूण १२०४ बॉक्स (५७ हजार ७९२ बाटल्या) अशा प्रकारे एकुण रुपये १ कोटी १५ लाख ५८ हजार ४०० हजार इतक्या किंमतीचा मद्यसाठा, वाहन व मोबाईलसहीत एकुण १ कोटी ३३ हजार ७८ हजार ४०० रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये वाहनचालकाविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ तील कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत उपअधीक्षक संतोष जगदाळे, निरीक्षक संभाजी बरगे यांनी सहभाग घेतलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक संभाजी बरगे हे करीत आहेत. जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध नियमित कारवाई सुरु राहणार असून कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी टोल फ्री. क्रमांक. १८००२३३९९९९ व दुरध्वनी क्रमांक ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top