Breking News
Monsoon Update : महाराष्ट्रात मान्सून का लांबणीवर जातोय…कधी होणार मान्सूनला सुरवात?असहिष्णू वातावरणात विनोद फुलू शकत नाही- प्रा मिलिंद जोशीपुण्यात सायबर चोरट्यांकडून ६ कोटी २५ लाखांची फसवणूकब्युटी पार्लरमधील महिलेकडून अंगठी चोरीलाफ्लॅटबाहेर पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवणे महागातमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणीमहिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआडसोशल मीडियावर कृषी विभागात नोकरीची जाहिरातवानवडीत अतिक्रमणांवर बुलडोझर; अनधिकृत टपऱ्या हटवल्याट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या तरुणाने सोडला श्वास

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडके १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, चालक फरार

टँकर चालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दत्तात्रय मोहन पंडीत (वय ४७, रा. ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंडीत यांचा चुलतभाऊ रविराज (वय २६) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीतील गजाआड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दत्तात्रय पंडीत हे ८ मे रोजी रात्री आठच्या सुमारास पुणे -अहिल्यानगर रस्त्यावरील तुळापूर फाटा परिसातून निघाले होते. त्या वेळी पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरने दुचाकीस्वार पंडीत यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंडीत याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे तपास करत आहेत.

शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. वानवडी भागात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार अभियंता तरुणीचा मृत्यू झाला होता. हडपसरमधील महंदमवाडी परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुण, तसेच बिबवेवाडी -कोंढवा रस्त्यावर दुचाकीस्वार हाॅटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी टँकर चालक मालकांची बैठक घेऊन त्यांना वाहतूक नियमांचे पालन, तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×