ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
marathinews24.com
पुणे – भरधाव वेगाने दुचाकी चालवून पाठीमागून ट्रकला धडकून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याचे तपासाअंती उघडकीस आले आहे. हा अपघात १४ एप्रिलला रात्री दीडच्या सुमारास दरीपूल जांभुळवाडी परिसरात घडला होता. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. शिवाजी बबन जाधव (वय ५५ रा. आंबेगाव बुद्रूक) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार केच्चांप्पा जनवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे.
बायकोचा खून केला, दुचाकीवर मृतदेह नेताना रंगेहात पकडला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शिवाजी जाधव हे १४ एप्रिलला दुचाकीवरून घरी जात होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास दरीपूल जांभुळवाडी परिसरातून जाताना भरधाव वेगातील जाधव हे पाठीमागून ट्रकला धडकले. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात दुचाकीस्वार शिवाजी जाधव हे भरधाव वेगात ट्रकला धडकल्यामुळे गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.