Breking News
पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासापुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस कायम

मैत्रिणीवरुन झालेल्या वादातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

येरवडा, थेउर फाटा परिसरात पादचार्‍यांसह चालकाला लुटले

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वा चोरट्यांचा हैदोस कायम असून, निमुर्नष्य ठिकाणांसह वर्दळ कमी असलेल्या जागेवर पादचार्‍यांसह वाहन चालकांना अडवून लुटमारीचे सत्र कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, दुचाकीस्वार चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. येरवडा, थेउर फाटा परिसरात घडलेल्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून – सविस्तर बातमी

पायी चाललेल्या तरूणाला अडवून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्याकडील रोकड आणि कागदपत्रे हिसकावल्याची घटना ६ मे रोजी येरवड्यातील चित्रा चौकात घडली आहे. याप्रकरणी खडकी बाजार परिसरात राहणार्‍या तरूणाने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरूण पायी जात असताना चोरट्यांनी त्याला अडवून थांबवले. त्याच्याकडील अडीच हजारांची रोकड, महत्वाची कागदपत्रे हिसकावून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे तपास करीत आहेत.

गाडी चालवून थांबल्यामुळे आराम करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या दुचाकीस्वार तरूणाला तिघाजणांना धमकावून लुटले आहे. ही घटना ७ मे रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास थेउर फाटा परिसरातील काळभोर वाड्याजवळ घडली आहे. याप्रकरणी चाकणमधील जामदार वस्तीवर राहणार्‍या २६ वर्षीय तरूणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिघा दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण चाकणमध्ये राहायला असून, ७ मे रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास दुचाकी चालवून रस्त्यालगत थांबला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी त्याच्याजवळ येउन विचारणा केली. तू इथे का थांबला आहे, ही थांबण्याची जागा आहे का, असे म्हणत तरूणाला शिवीगाळ केली. तरूणाकडील दोन हजारांची रोकड आणि दुचाकी जबरदस्तीने हिसकावून घेउन चोरट्यांनी पळ काढला. तरूणाने आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.

वाहन चालकांनो काळजी घ्या, निमुर्नष्य ठिकाणी थांबू नका

वाहन चालकांनो तुम्ही रात्री-अपरात्री दुचाकीवरून प्रवास करीत असल्यास खबरदारी घेणे गरजेचे आहे. विशेषतः मध्यरात्री कामावरून सुटल्यानंतर निमर्नुष्य ठिकाणांवर न थांबता मार्गक्रमण करावे. तुमचा कोणी पाठलाग करीत असल्यास जवळची पोलीस चौकी, पोलीस ठाण्याकडे जावे. प्रामुख्याने पेट्रोलपंप, गर्दी असलेल्या हॉटेलजवळ थांबून घटनेची माहिती नागरिकांना द्यावी. प्रवासादरम्यान कोणत्याही संशयास्पद व्यक्ती अथवा, वाहन चालकांसोबत बोलू नका. लुटमारीच्या अशा घटनांपासून वाचण्यासाठी जनजागृती करा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×