Breking News
Bandhavgarh Wildlife Conservation : बांधवगड येथे ‘श्रीमती इंद्राणी बालन इंटरप्रिटेशन सेंटर’चे भूमिपूजनBirsa Munda Jayanti 2026 : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त घोडेगावमध्ये जनजातीय गौरव दिनChhagan Bhujbal Pune Visit : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या विकासकामांची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणीShivaji Maharaj Wagh Nakh Exhibition : लंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावीतPune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविले

Birsa Munda Jayanti 2026 : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त घोडेगावमध्ये जनजातीय गौरव दिन

Birsa Munda Jayanti 2026

आदिवासी रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाचे आयोजन

marathinews24.com

पुणे – Birsa Munda Jayanti 2026 : क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त रविवार (दि. १५) घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे जनजातीय गौरव दिन तसेच आदिवासी रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव यांच्या वतीने पृथ्वी मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम होणार आहे.

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या विकासकामांची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी – सविस्तर बातमी 

भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा, शौर्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाला उजाळा देणे, तसेच आदिवासी समाजाच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणे हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता आदिवासी नृत्य व लेझीम पथकांच्या सहभागातून काढण्यात येणाऱ्या प्रभातफेरीने होईल. प्रकल्प कार्यालय, घोडेगाव येथून तहसील कार्यालयामार्गे ही प्रभातफेरी पृथ्वी मंगल कार्यालय येथे पोहोचेल. (Birsa Munda Jayanti 2026) सकाळी १० वाजता दीपप्रज्वलन व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होईल. यावेळी स्वागतगीत, मान्यवरांचा सत्कार, प्रास्ताविक तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात येणार आहे. विविध आदिवासी लोकनृत्यांचे सादरीकरण आणि इंग्लिश मीडियम स्कूल, घोडेगाव येथील विद्यार्थ्यांची भाषणेही होणार आहेत.

दुपारी १२ वाजता आदिवासी सेवक पुरस्कारप्राप्त व्यक्ती आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असून, लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात येईल. दुपारी १२.३० वाजता पारधी मेळावा तसेच आदिवासी रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवातून आदिवासी समाजातील पारंपरिक खाद्यपदार्थ, विविध रानभाज्या आणि खाद्यपरंपरांचे दर्शन घडणार आहे.

दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती अनुसूचित जमातीतील नागरिकांना तसेच पारधी बांधवांना देण्यात येणार आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही या उपक्रमातून करण्यात येणार आहे. जनजातीय गौरव दिन सप्ताहांतर्गत ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकार परिषद, तालुकास्तरीय कार्यक्रम, लाभार्थ्यांना धनादेश वितरण, ग्रामस्वच्छता व दीपोत्सव, पारधी मेळावा, आधारकार्ड व शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिर, आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर तसेच आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचा समावेश आहे.

आदिवासी समाजाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासोबतच समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणे, त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, हा या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. या कार्यक्रमास आदिवासी बांधव, नागरिक, विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगावचे प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×