Breking News
Bandhavgarh Wildlife Conservation : बांधवगड येथे ‘श्रीमती इंद्राणी बालन इंटरप्रिटेशन सेंटर’चे भूमिपूजनBirsa Munda Jayanti 2026 : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त घोडेगावमध्ये जनजातीय गौरव दिनChhagan Bhujbal Pune Visit : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या विकासकामांची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणीShivaji Maharaj Wagh Nakh Exhibition : लंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावीतPune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविले

Shivaji Maharaj Wagh Nakh Exhibition : लंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावीत

Shivaji Maharaj Wagh Nakh Exhibition

रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राहुल डंबाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

marathinews24.com

पुणे – Shivaji Maharaj Wagh Nakh Exhibition : लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून राज्यात आणण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक ‘वाघनखे’ पुणे येथील शिवप्रेमी आणि नागरिकांना पाहण्यासाठी पुण्यात प्रदर्शनास ठेवावीत, अशी मागणी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राहुल डंबाळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.

कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळ – सविस्तर बातमी 

राज्य शासनाच्या सध्याच्या नियोजनानुसार ही ऐतिहासिक वाघनखे सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि सध्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. मात्र, या संपूर्ण वेळापत्रकात पुणे शहराचा समावेश नसल्याने पुणेकरांमध्ये आणि शिवप्रेमींमध्ये नाराजीची भावना आहे. राहुल डंबाळे म्हणाले की, “पुणे ही स्वराज्याची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचा आणि पराक्रमाचा इतिहास या मातीशी जोडलेला आहे. पुण्यात देशभरातून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेले लाखो तरुण, विद्यार्थी आणि स्थानिक शिवभक्त राहतात. (Shivaji Maharaj Wagh Nakh Exhibition) प्रत्येकाला मुंबईला जाऊन ही वाघनखे पाहणे शक्य नाही. त्यामुळे राज्य शासनाने लंडनच्या संग्रहालयाशी विशेष पाठपुरावा करून पुण्यातही या वाघनखांचे प्रदर्शन भरवावे, जेणेकरून पुणेकरांना आपल्या राजाच्या पराक्रमाचे प्रतीक जवळून पाहता येईल. ऐतिहासिक वास्तूमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन केल्यास लाखो शिवभक्तांना त्याचा लाभ घेता येईल, असेही डंबाळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×