Breking News
Bandhavgarh Wildlife Conservation : बांधवगड येथे ‘श्रीमती इंद्राणी बालन इंटरप्रिटेशन सेंटर’चे भूमिपूजनBirsa Munda Jayanti 2026 : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त घोडेगावमध्ये जनजातीय गौरव दिनChhagan Bhujbal Pune Visit : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या विकासकामांची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणीShivaji Maharaj Wagh Nakh Exhibition : लंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावीतPune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविले

Chhagan Bhujbal Pune Visit : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या विकासकामांची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी

Chhagan Bhujbal Pune Visit

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाची कामे गतीने पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

marathinews24.com

पुणे – Chhagan Bhujbal Pune Visit : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्ताने महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वारसा पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे; याबाबीचा विचार करता भिडेवाडा येथील विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि गतीने पूर्ण करावीत, द्विशताब्दी जन्मवर्षाचे औचित्य साधून स्मारकाचे लोकार्पण होईल या पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

Chhagan Bhujbal Pune Visit
Chhagan Bhujbal Pune Visit

लंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ पुणेकरांसाठी उपलब्ध करून द्यावीत – सविस्तर बातमी 

भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक भिडेवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाला तसेच महात्मा फुले वाडा येथे दिलेल्या भेट देवून विकासकामांची पाहणी केली, तसेच स्मारकाच्या उभारणीची प्रगती, वास्तुरचना आणि संवर्धनाच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. (Chhagan Bhujbal Pune Visit) यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता बिपीन शिंदे, उपायुक्त श्री अविनाश संकपाळ स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, नागरिक आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, भिडेवाडा हे भारतीय समाजसुधारणेच्या आणि स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचे प्रेरणास्थान आहे. या स्मारकाचे काम ऐतिहासिक वारशाचे जतन करत दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावे. स्मारकाचा परिसरातील रहदारीचा विचारात घेता आगामी काळात या परिसरातच पर्यायी वाहनतळाची व्यवस्था करावी. यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

ते पुढे म्हणाले, महात्मा फुले वाडा यांचा माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते देशाला अर्पण करण्यात आला होता. आता महात्मा फुले स्मारकासाठी आराखडा तयार करुन जागा आरक्षित करण्यात आली आहे. याकरीता आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्यावतीने भुसंपादनाची कार्यवाही सुरु आहे. बधितांना चारपट मोबदला देण्याबाबतचा ठराव पारित केला आहे, सदर ठरावाच्या नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात याव्यात. प्रशासनाने याकामी स्थानिक लोकप्रतिनिधी,नागरिकांना विश्वासात घ्यावे, असे सांगून याकामी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती, विविध टप्प्यांतील प्रगती तसेच पुढील नियोजनाची माहिती मंत्री भुजबळ यांना दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×