Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यात घरगुती गॅसचा काळा बाजार; दुकानावर छापा

पुण्यात घरगुती गॅसचा काळा बाजार; दुकानावर छापा

१०३ सिलिंडरच्या टाक्या जप्त; काळेपडळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. तब्बल १०३ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून एकाला अटक करण्यात आली आहे. नितीन हनुमंत होळकर (वय ३८, रा. हांडेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वृध्द आई वडीलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलावर गुन्‍हा दाखल – सविस्तर बातमी 

हांडेवारी परिसरात एकजण घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये गॅस ट्रान्स्फर करत असल्याची माहिती पोलिस अंमलदार महादेव शिंदे यांना मिळाली. तसेच गॅस सिलिंडरच्या अवैध गॅस साठा व विक्रीच्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासादरम्यान घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापरासाठी तसेच काळा बाजारासाठी साठा करून ठेवण्यात आल्याचे उघड झाले.

पोलिसांनी १०३ गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य जप्त केले. याची किंमत ९० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. संबंधित आरोपीकडे गॅस साठवणुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक अमित शेटे, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर यांच्यासह पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×