Breking News
ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीकडून गोळीबार; दोघे जखमीकेंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते लिंगभाव समावेशनावरील आशियातील पहिल्या युनेस्को अध्यासनाचे उद्घाटनमराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण

वृध्द आई वडीलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलावर गुन्‍हा दाखल

वृध्द आई वडीलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलावर गुन्‍हा दाखल

काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वृध्द आई-वडीलांचा सांभाळ करण्याचे आदेश ज्‍येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण यांनी दिले असताना देखील आदेशाची अंमलबजावणी न केल्‍याने मुलावर आता गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. शरीफ शफिक खान (वय ४८, रा दुसरा मजला सय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर) असे गुन्‍हा दाखल करण्यात आलेल्‍या मुलाचे नाव आहे. तर याबाबत वडील शफिक फकिर मंहमंद खान (वय ८२, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी ज्‍येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालपोषण आणि कल्‍याण अधिनियम २००७ च्‍या कलम २४ नुसार गुन्‍हा दाखल झाला आहे. २०१९ ते १३ एप्रिल २०२६ दरम्‍यान हा प्रकार घडला.

पुणेकरांनो रस्त्यावरील बेवारस वाहने हलवा, अन्यथा वाहन जप्ती होणार – सविस्तर बातमी 

ज्‍येष्ठ नागरिक असलेल्‍या पित्‍याने मुलाकडून आपला व वृध्द पत्‍नीचा सांभाळ केला जात नसल्‍याने मुलाविध्द दाम्‍पत्‍याने उपविभागीय अधिकारी कार्यालयातील ज्‍येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकारणाकडे धाव घेतली होती. यामध्ये न्यायाधिकरणाने आई-वडीलांना प्रतिमहा ०१ हजार देण्याचे आदेश पारित केले होते. न्यायाधिकरणाने आदेश देऊनही मुलगा शरीफने कोणत्याही आदेशाचे पालन केले नाही. आई-वडीलांचा सांभाळ केला नाही. त्‍यामुळे आदेशाची अंमलबजावणी मुलाकडून होत नसल्‍याने वडीलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आदेशाचा अवमान झाल्‍याने गुन्‍हा दाखल करण्याची मागणी केली. त्‍यानुसार काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रविण अब्दागिरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×