Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणार

फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणार

खूनाच्या प्रयत्नातील दोन रिले स्टार तरूणींसह तिघांना अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती डेक्कन परिसरात सातत्याने नियमांचे उल्लंघन करणार्‍या फ्लाईंग जिप्सी कॅफेला डेक्कन पोलिसांनी दणका दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महानगर पालिकेला पत्रव्यवहार केला असून, कॅफे मालकाकडील शॉपअ‍ॅक्ट, घरातच कॅफे उघडल्यासह इतर कारवाई करण्याचे महानगरपालिका प्रशासनाला सुचवले आहे. त्यानंतरच कॅफे उघडण्याची परवानगी दिली जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली आहे. १५ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास टोळक्याने तरूणाच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन रीलस्टार तरूणींसह तिघांना अटक केली आहे.

सिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटक – सविस्तर बातमी 

रिलस्टार माधवी राजेश कुंभार (वय २२ रा. काळेपडळ, हडपसर) स्नेहल संजय सोनके (वय २० रा. पिंपळे गुरव ) शार्दूल ओव्हाळ (रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फ्लाईंग जिप्सी कॅफे सातत्याने चर्चेत येत असून, वादविवाद, तरणाईचा धांगडधिंग्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांनी यासंदर्भात सातत्याने तक्रारी केल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र संबंधित कॅफे चालकासह मालकाविरूद्ध कारवाई केली नाही. त्यामुळे रात्रभर बिनधिक्कपणे कॅफे उघडे ठेउन सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केल्यानंतर त्याच्याविरूद्ध डेक्कन पोलिसांकडून कारवाई केली नाही. दरम्यान, १५ ऑगस्टला पहाटे पावणेचार वाजेपर्यंत फ्लाईंग जिप्सी कॅफे उघडे ठेवण्यात आले होते. त्यावेळी दोन रिलस्टार गटात झालेल्या वादविवादानंतर टोळक्याने तरूणाच्या डोक्यामध्ये कोयत्याने वार करून खूनाचा प्रयत्न केला. त्यानंतर जाग आलेल्या डेक्कन पोलिसांनी तत्काळ धाव घेतली.

खटलाही दाखल नाही, कारवाईच्या नावाने टोलवाटोलवी

शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हॉकर्स व्यावसायिकांना रात्री दहाच्या आतमध्ये आस्थापना बंद करण्यासाठी दंडुका उगारला होता. तर नियमित आस्थापना रात्री दीड वाजेनंतर बंद करण्यासाठी पोलिसांकडून दंडेलशाही केली जात होती. मात्र, १५ ऑगस्टला पहाटे साडेतीन वाजेपर्यंत कॅफे उघडे ठेउन पोलिसांच्या नाकावर टिच्चून फ्लाईंग जिप्सीच्या मालकाने नियमांचे उल्लंघन केले. त्याच्याविरूद्ध डेक्कन पोलिसांनी साधा खटलाही दाखल केला नाही. आता मात्र, महापालिकेला पत्रव्यवहार करून कारवाईसाठी टोलवाटोलवी केली जात आहे.

रिलस्टारमध्ये एकवर्षापुर्वी सुरू झाला वाद

अथर्व जगताप आणि आरोपी माधवी कुंभार हे दोन रिलस्टार असून, त्यांच्यात माधमागील एक वर्षापासून वाद सुरू झाला होता.सातार्‍यातील कासपठारावर गाडी ओव्हरटेकमुळे वाद सुरू झाला. त्यानंतर एकमेकांच्या रिल्स, व्हिडिओवर चिडवणे, खोड काढली जात होती. १५ ऑगस्टला पहाटे रिलस्टार अथर्व हा मित्रांसोबत फ्लॉईंग जिप्सी कॅफेत बसला होता. त्यावेळी आरोपी माधवीने आरोपींना बोलावून घेतले. प्रेम उर्फ पम्या मनोज साळवे याने अथर्ववर कोयत्याने वार केले. याप्रकरणी ८ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे, असेही उपायुक्त रावले यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×