Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

पुण्यात रंगोत्सवाला गालबोट; चौघे जखमी

होळी कार्यक्रमादरम्यान लोखंडी खांब कोसळल्याने अपघात

marathinews24.com

पुणे – शहरात रंगोत्सवाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले असून, होळीनिमित्त आयोजित कलर कल्चर कार्यक्रमावेळी स्टेजवरील आडवा लोखंडी खांब कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये चार तरूण-तरूणी जखमी झाले असून, त्यांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.३) दुपारच्या सुमारास मुंढवा परिसरातील रॉयल पाम्स याठिकाणी घडली आहे. दरम्यान, दुर्घटनेमुळे कार्यक्रमावेळी प्रचंड गोंधळ, आरडाओरड झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

वाढदिवस साजरा करण्यासाठी दाम्पत्याला लुटले, चौघांना बेड्या – सविस्तर बातमी

होळी सणानिमित्त रॉयल पाम्स याठिकाणी ‘कलर कल्चर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्तालयाने परवानगी दिली होती. त्याठिकाणी शेकडो तरूण-तरूणी कार्यक्रमासाठी एकत्रित आले आहे. रंगोत्सव ऐन भरात आलेला असताना अचानकपणे मोठा आवाज झाला. स्टेजवरील भला मोठा लोखंडी खांब खाली कोसळल्याचे दिसून आले. त्यावेळी जवळच नृत्य करीत असलेल्या तरूणाईमध्ये घबराट निर्माण झाले. अपघातात चार जण जखमी झाले. धावपळ, आरडाओरड, गोंधळामुळे परिसरातील वातावरण गंभीर झाले होते. घटनेची माहिती नागरिकांकडून पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर मुंढवा पोलिसांनी तातडीने धाव घेतली.

स्टेजवरील आडवा लोखंडी बीम अचानक कोसळल्यामुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुर्घटनेत जखमी झालेल्या चौघांना तत्काळ ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेनंतर कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. या संदर्भात मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी माहिती दिली की ‘स्टेजचा आडवा लोखंडी बीम कोसळल्यामुळे काही जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. दरम्यान, घटनेचे नेमके कारण काय याचा तपास पोलिसांकडून सुरू असून आयोजकांकडील सुरक्षा व्यवस्थेचीही चौकशी केली जात आहे.

मुंढव्यातील रॉयल पाम्स याठिकाणी कलर कल्चर कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी स्टेजचा आडवी लोखंडी बीम कोसळल्यामुळे चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×