Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

वाढदिवस साजरा करण्यासाठी दाम्पत्याला लुटले, चौघांना बेड्या

वाढदिवस साजरा करण्यासाठी दाम्पत्याला लुटले, चौघांना बेड्या

बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वाढदिवस साजरा करण्यासाठी दाम्पत्याला लुटणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले. रिक्षा प्रवासी म्हणून बसल्यानंतर त्यांनी दाम्पत्याला धमकावत महिलेच्या मोबाईलवरून ऑनलाईन २५ हजार रुपये घेतले होते. याप्रकरणी गणेश आण्णा जगधने (वय २९), अमोल उत्तम गायकवाड (वय ३२), अतुल रविंद्र गायकवाड (वय ३८) व संतोष राधाकिशन सरोदे (वय ३१, रा. सर्व. गुलटकेडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी 

शहरात लुटमारीच्या घटना वाढत आहेत. गेल्या आठवड्यात स्टेशन परिसरात रिक्षा प्रवासी म्हणून बसलेल्या बिहारमधील दाम्पत्याला रिक्षा चालकासह त्याच्या तीन साथीदारांनी धमकावून लुटले होते. विवाहितेच्या मोबाईलमधून ऑनलाईन २५ हजार रुपये काढून घेत पोबारा केला होता. या आरोपींचा माग पोलीस काढत होते. पोलिसांनी भागातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू केल्यानंतर गणेश तसेच अमोलची नावे समोर आली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी साथीदार अतुल व संतोष यांच्यासोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी आणखी कोणाला लुटले आहे का यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

त्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे नसल्याने ही लुटमार करून वाढदिवस साजरा केल्याचे तपासातून समोर आले आहे. ही कारवाई बंडगार्डन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलिस अंमलदार प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरेसह पथकाने केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×