Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

देहदान ही वैद्यकीय शिक्षणाला दिलेली अमूल्य देणगी

देहदान ही वैद्यकीय शिक्षणाला दिलेली अमूल्य देणगी

अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांचे प्रतिपादन

marathinews24.com

बारामती – देहदानाला वैद्यकीय शिक्षणात अनन्यसाधारण महत्त्व असून देहदात्यांच्या योगदानामुळे भावी डॉक्टरांना मानवी शरीररचनेचा प्रत्यक्ष व सखोल अभ्यास करता येतो. देहदान ही वैद्यकीय शिक्षणाला दिलेली अमूल्य देणगी आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ अंजली पाटील यांनी केले.

एमपीएससी निकालात ‘महाज्योती’ची भरारी – सविस्तर बातमी 

बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात देहदान करणाऱ्या कुटुंबीयांच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपस्थित होते.
यावेळी श्री.बिरादार यांनी देहदान व अवयवदानाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करत समाजात व्यापक जनजागृती करुन अधिकाधिक नागरिकांनी या महान कार्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

डॉ. गीतांजली सुडके यांनी देहदानातून वैद्यकीय शिक्षण, संशोधन तसेच देहदानाची आजच्या काळाची गरज या विषयी सविस्तर विश्लेषण केले, तर डॉ. सुरज जाधवर यांनी अवयवदानातून गरजू रुग्णांना मिळणाऱ्या जीवनदानाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी देहदान करणाऱ्या दात्यांच्या नातेवाईकांचा स्मृतीचिन्ह देऊन विशेष सन्मान करून त्यांच्या महान मानवतावादी निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान देहदान व अवयवदानाबाबत समाजात असलेल्या गैरसमज व शंकांचे निरसन दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला उपअधिष्ठाता डॉ. सचिन दगडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश उमाप तसेच प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. विवेक सहस्त्रबुध्ये, डॉ. लीना नकाते, डॉ. राजेश हिरे, डॉ. विनय टापरे, डॉ. किरण जाधव, डॉ. सुजाता धर्मशाळे आणि विद्यार्थी, देहदात्यांचे नातेवाईक, पत्रकार, कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे किरण घुगे यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×