आरोपीविरूद्ध बिबवेवाडी पोलिसांनी दाखल केला गुन्हा
marathinews24.com
पुणे – किरकोळ वादातून भावावर कुर्हाडीने हल्ला करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना १४ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बिबवेवाडीतील पापाळवाड्यात घडली आहे. याप्रकरणी आरोपीविरूद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नितीन पंढरीनाथ पापळ (वय ५०, रा. पापळवाडा, बिबवेवाडी ) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी मनोहर पंढरीनाथ पापळ (वय ४५) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अश्विनी पापळ (वय ३७ रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पापळ कुटूंबिय बिबवेवाडीत राहायला असून, नितीन आणि पंढरीनाथ भावडांमध्ये किरकोळ वादावादी झाली होती. त्याच रागातून १४ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लहान भाउ मनोहरने नितीनला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तुझ्यात दम असेल तर तू खाली ये, असे म्हणत त्यांना धमकाविले. त्यामुळे नितीन खाली गेला असता, आरोपी मनोहरने त्याच्यावर कुर्हाडीने हल्ला चढविला. त्यांच्या डोक्यात, खांद्यावर, डोळ्यावर वार करून आरोपीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव तपास करीत आहेत.