Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

कॉलेजच्‍या आर्थिक व्यवहारासाठी भावांची भांडणे

व्यावसायिकाला धमकावून ६० हजारांची रोकड लुटली

लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल

marathinews24.com

पुणे – श्रीरामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअररीग व डिप्लोमा कॉलेज येथील सीसीटिव्‍हीचा पासवर्ड का बदलला व महत्‍वाच्‍या फाईली कोठे ठेवली अशी विचारणा करणाऱ्या सख्या भावाला मारहाण करणाऱ्या भावावासह पुतण्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शंकर रामचंद्र भुमकर (58) व सिध्दांत शंकर भुमकर (25, रा. लोणीकंद सगुणा निवास, ता. हवली, जि. पुणे) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या दोघांची नावे आहेत.

आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्तात वाढ – सविस्तर बातमी 

उध्दव रामचंद्र भुमकर (65, रा. सगुणा निवास बिल्‍डींग, लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्‍या सुमारास त्‍यांच्‍या राहत्‍या घराजवळ घडला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तक्रारदार उध्दव भुमकर हे शेती करतात. त्‍यांच्‍या मिळकती पैकी काही मिळकत लोणीकंद येथील बकोरी रोडवर आहे. तेथे श्री रामचंद्र एज्‍युकेशन सोसायटीच्‍या अंतर्गत श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व डिप्लोमा कॉलेज हे दोन्‍ही कॉलेजचा कार्यभार उध्दव भुमकर व लहान भाऊ शंकर भुमकर व त्‍यांचा मुलगा सिध्दांत भुमकर असे पाहतात. परंतु कॉलेजचा आर्थिक व्यवहार भाऊ शंकर भुमकर व त्‍यांचा मुलगा सिध्दांत हे दोघे पहातात. उध्दव यांना कॉलेजच्‍या आर्थिक व्यवहाराबाबत काहीही कळू देत नाही. काही विचारल्‍यास उध्दव यांना दमदाटी होत होती.

शंकर आणि त्‍यांचा मुलगा सिध्दांत यांनी अचानक कॉलेजच्‍या सीसीटिव्‍हीचा पासवर्ड बदलला आणि महत्‍वाच्‍या फाईली दुसरीकडे हलविल्‍या. दरम्‍यान लहान भाऊ शंकर हा घराजवळ असताना उध्दव यांनी त्‍याला सीसीटिव्‍हीचा पासवर्ड का बदलला व महत्‍वाच्‍या फाईली कुठे ठेवल्‍या आहेत याबाबत विचारणा केली. त्‍याचा राग आलयाने शंकरने व त्‍याच्‍या मुलाने उध्दव यांना लाथा बुक्‍यांनी मारहाण केली. तसेच खाली पाडून हातातील कठीण वस्‍तूने गंभीर मारहाण केल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

या सर्व प्रकारानंतर उध्दव यांना ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्‍यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यात मारहाण प्रकरणी गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×