Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्तात वाढ

आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्तात वाढ

धार्मिक स्थळे, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना

marathinews24.com

पुणे – अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शहरातील धार्मिक स्थळे, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुण्यातील एफसी रोड, जेएम रोडवरील ४० फेरीवाल्यांविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

‘आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील भागात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत’, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळून आल्यास त्वरित पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (क्रमांक- ११२) किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा’, असे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शहरात १२० ते १२५ इराणी नागरिक वास्तव्यास आहेत. पर्यटन, व्यवसाय,वैद्यकीय उपचार शैक्षणिक व्हिसावर इराणी नागरिक वास्तव्यास आले आहेत. काही इराणी महिलांनी भारतीय नागरिकांसोबत विवाह केले आहेत. अशा ३० महिला शहरात वास्तव्यास आहेत. शहरात ६० इराणी विद्यार्थी आहेत. इराणी विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत संपत असल्यास ती वाढवून देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. इराणी विद्यार्थी, तसेच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून व्हिसाची मुदत वाढवून देण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×